
बीड : येथील आठवले गॅंगसोबत सावलीसारखा राहणाऱ्या मनीष क्षीरसागरच्या घरात तीन महिन्यांपूर्वी बनावट चलनी नोटांचा कारखाना मिळून आला होता. यामध्ये बीड शहर पोलिसांनी प्रमुख आरोपीस अटक केली होती. परंतु, यातील मनीष क्षीरसागर हा पोलिसांना तेव्हापासून गुंगारा देत होता. बार्शी नाक्यावरील डोंगरे कुटुंबावरील खुनी हल्ल्यामध्ये पुन्हा मनीष क्षीरसागर याचा सहभाग निश्चित झाला आणि स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून उचलले.