न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Published on
ABD26J79520 छत्रपती संभाजीनगर ः दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने काळ्या फिती लावून कामकाज केले. --- ‘समान काम-समान वेतना’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन - छत्रपती संभाजीनगर, ता. १६ : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी (ता. १६) जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने न्यायमूर्तींची विशेष समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल शासनाकडे सादर होऊन सुमारे २० महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली. शासनाने मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. त्यानुसार, बुधवारपाठोपाठ (ता. १६) गुरुवारी (ता. १७) पुन्हा काळ्या फिती लावून कामकाज करून शासनाचा निषेध केला जाणार आहे. त्यानंतरही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून राज्यातील न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला. - शासनाने मागणी पूर्ण करावी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय दांडगे म्हणाले, की समान काम, समान वेतनासंदर्भात विशेष समितीचा अहवाल शासनाकडे सादर होऊनही त्यावर निर्णय झालेला नाही. आंदोलनाची पुढील वेळ येऊ न देता शासनाने मागणी पूर्ण करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com