esakal | औरंगाबादकरांनो चिमुकल्यांची काळजी घ्या! अवघ्या दहा दिवसात २२० बालके बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

औरंगाबादेत अवघ्या दहा दिवसात २२० बालके बाधित!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी सुरू असताना दुसरी लाट ओसरतानाच शून्य ते १८ वयोगटातील करोनाबाधित मुलांची संख्या वाढत आहे. गेल्या दहा दिवसात २२० बालके बाधित आढळून आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने नागरिक बाधित झाले. पण समाधानाची बाब म्हणजे दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २०० पेक्षा खाली आली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला असला तरी रुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर येत आहे. गेल्या दहा दिवसात शून्य ते पाच वयोगटातील ४८ तर ५ ते १८ वयोगटातील १७१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. बालकांमध्ये कोरोना संसर्गाचा झपाट्याने वाढत असला तरी लक्षणे सौम्य असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: 'राज्याने प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजारांचे अनुदान द्यावं'

१६५४ ॲक्टीव्ह रुग्ण
महापालिकेच्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार ६५४ एवढी आहे. अनेक कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना संसर्ग कमी होत असताना दुसरीकडे मात्र मुलांना संसर्ग होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

तारीख- शून्य ते पाच- पाच ते अठरा (वयोगट)

१० मे- ०८- २३
११ मे - १०- २६
१२ मे- ०४- २३
१३ मे- ०४- १५
१४ मे- ०६- २०
१५ मे- ०२- ०४
१६ मे- ०४- १६
१७ मे- ०५- १३
१८ मे- ०२- १६
१९ मे- ०३- १५
-----------------------------
एकूण- ४८- १७१

loading image
go to top