
लातूर : लातूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून आठवडाभरात चार रुग्णांना या संसर्गाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरकारने लातुरातील आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, चारमधील एक रुग्ण उपचारानंतर बरा झाला असून त्याला मंगळवारी (ता. २७) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.