esakal | दिलासादायक! औरंगबादेतील कोरोना रुग्णांत घट; 24 तासांत सहाशेजण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

दिलासादायक! औरंगबादेतील कोरोना रुग्णांत घट; 24 तासांत सहाशेजण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १८) एकूण ५६८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील १७४ व ग्रामीण भागातील ३९४ रुग्णांचा समावेश आहे. आज १८ जणांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३५ झाली. आजपर्यंत एकूण २ हजार ९६६ जणांचा मृत्यू झाला. आज ६०० रुग्णांना सुटी झाली. यात शहरातील १२८ व ग्रामीण भागातील ४७२ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख २८ हजार ७४३ रुग्णांना सुटी झाली. सध्या एकूण ६ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधितांचा मृत्यू -
घाटी रूग्णालयात म्हाडा कॉलनी, बन्सीलालनगर येथील पूरूष (३२), पैठण येथील महिला (५०), चित्ते पिंपळगाव (जि. औरंगाबाद) येथील महिला (६२), बीडकीन (ता. पैठण) येथील पूरूष (५३), शिवाजीनगर सिल्लोड येथील पूरूष (५५), पाचलेगाव (ता. पैठण) येथील महिला (६०), लाडगाव रोड, वैजापूर येथील महिला (६०), खोपेश्‍वर (ता. गंगापूर) येथील पूरूष (४५), खंडाळा (ता. वैजापूर) येथील महिला (६२), कन्नड येथील पूरूष (६५), नाईकनगर, बीडबायपास येथील पूरूष (५८), फुलंब्री येथील महिला (४५), ब्रिजवाडी ,चिकलठाणा येथील (५४), पैठणखेडा येथील महिला (४५) कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यासह खासगी रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: आजीचं अख्खं कुटुंब कोरोनाबाधित; मदतीला धावला 'देवदूत'

कोरोना मीटर
बरे झालेले : १२८७३
उपचार घेणारे : ६३२६
एकुण मृत्यू : २९६६

आतापर्यंतचे बाधित : १३८०३५