

Punjab Regiment soldier Prabhakar Muskawar
sakal
देगलूर : भारतीय लष्करामध्ये सलग १५ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावून मायभूमीचे रक्षण करणारे शहापूर (ता. देगलूर) येथील सुपुत्र, जवान प्रभाकर भुमरेड्डी मुस्कावार (Army No. 2501546F) यांचे वार्षिक रजेवर असताना शनिवार . ता.१० रोजी सायंकाळी अपघाती निधन झाले होते. देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र तैनात असलेल्या या वीरपुत्रावर काळाने झडप घातल्याने संपूर्ण देगलूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.