Aurnaabad : वाळूचोरी प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo
वाळूचोरी प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा

वाळूचोरी प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : मागील आठवड्यामध्ये महसूलच्या कर्मचाऱ्यांनी बोरगाव बाजार व बोरगाववाडी येथे वाळूचा साठा जप्त करून पोलिस पाटलांच्या ताब्यात दिला होता. मात्र, ताब्यात असलेल्या वाळूसाठा वाळूमाफियांनी लांबविल्याची घटना घडली होती. याबाबत सकाळने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाच्या ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. याची दखल घेऊन सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.१६) दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोरगाव बाजार येथे गुरूवार (ता.११) तलाठी विष्णू गवळी यांनी ३ ते ४ ब्रास वाळूसाठा जप्त करून पोलिस पाटील योगेश उमरिया यांचे ताब्यात दिला होता. मात्र, गट क्रमांक ७९ मधील जप्त केलेला वाळूसाठा रविवारी (ता.१४) सर्जेराव साखरे, (रा.बोरगाव बाजार ता.सिल्लोड) याने चोरून नेल्याची तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या तक्रारीमध्ये म्हटले की, बोरगाववाडी येथे बुधवार (ता.१०) गट क्रमांक ३८८ मध्ये ९ ते १० ब्रास वाळूसाठा जप्त करून पोलिस पाटील नंदू बेडवाल (रा.बोरगाववाडी) व योगेश उमरिया (रा.बोरगाव बाजार) यांच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र, शनिवारी (ता.१३) पदम किशन लोधवाल (रा.बोरगाववाडी ता.सिल्लोड) याने चोरून नेल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

loading image
go to top