Crime News : चोर तो चोर वर शिरजोर! कैऱ्या तोडू न दिल्याने तरूणावर वार

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
mango
mango

छत्रपती संभाजीनगर : आंब्‍याच्या कैऱ्या तोडण्यावरुन तरुणावर धारदार वस्तूने वार करुन जखमी केले. हा प्रकार ११ मे रोजी धनमंडीबाग, भाजीमंडी, औरंगपुरा भागात घडला. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून शेख समीर अब्दूल रशीद (२६, रा.नारायणनगर, जुना बाजार) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे.

यासंदर्भात नितीन सुमीत पंडूरे (२१, रा. धनमंडीबाग) याने फिर्याद दिली. त्यानुसार नितीन याला त्याच्या काकूने फोन करुन सांगितले की, आपल्या आंब्याच्या कैऱ्या तोडण्यासाठी काही मुले आलेली आहेत. त्यावर नितीन हा आंब्याच्या झाडाजवळ गेला असता, तिथे संशयित आरोपी शेख समीर याचा भाचा सुलेमान होता.

mango
Crime News : "तू कोणासोबत बोलत होतीस" अशी विचारणा करत जीमहून परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग

सुलेमानसोबतची सर्व मुले गेली, तर नितीन याने सुलेमानला पकडून ठेवले, काही वेळात आरोपी तिथे आला आणि त्याने ‘माझा भाचा सुलेमानला कैऱ्या का तोडू देत नाहीस’ असे म्हणत नितीनच्या ओठावर धारदार वस्तूने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com