esakal | आमदार अंबादास दानवेंविरोधात क्रांती चौक ठाण्यात अखेर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

ambadas danve

यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत दराडे यांनी १५ ते २० दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले

आमदार अंबादास दानवेंविरोधात क्रांती चौक ठाण्यात अखेर गुन्हा

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा प्रकार २९ जून रोजी क्रांती चौक परिसरात घडला होती. रस्त्यात वाहतूक जॅम झाल्याने गर्दी हटविण्यासाठी आमदार दानवे रस्त्यावर उतरले होते. दरम्यान रिक्षाचालक अजय जाधव हे मध्येच घुसल्याचा राग आल्याने दानवे यांनी रिक्षाचालकास मारहाण केली होती. इतकेच नव्हे तर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केला होता. या प्रकरणी आता दानवेंविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत दराडे यांनी १५ ते २० दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले.

दानवे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे समाजात आपली समाजात बदनामी केल्यामुळे माझी मानहानी झाली आहे. काही एक चुक नसताना आमदाराने पोलिसांसमक्ष आपल्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी तक्रार रिक्षा चालकाने पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात केली आहे.

loading image
go to top