Crime News : नातवंडांना उद्यानात घेऊन गेलेल्या आजोबांचा हिसकावला मोबाइल

पोलिसांची गस्त का नाही? घटनेनंतर उपस्थित झाला सवाल
crime update Mobile stolen grandfather from park police security needed in park
crime update Mobile stolen grandfather from park police security needed in park Sakal Digital

छत्रपती संभाजीनगर : नातवंडांना उद्यानात फिरायला घेऊन गेलेल्या ६० वर्षीय आजोबांवर दोघांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांच्याशी झटापट करुन मोबाईल हिसकावून नेला. ही घटना १५ मेरोजी साडेचार वाजेदरम्यान सिडको एन-८ येथील बॉटनिकल गार्डनमध्ये घडली. याप्रकरणी आजोबांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रभाकर कारभारी बरबंडे (६०, रा. एन-६, मथुरानगर, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते दोन लहान नातवंडांना सदर गार्डनमध्ये फिरण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान ते गार्डनमध्ये एका झाडाखाली बसलेले असताना दोघे अनोळखी त्यांच्याजवळ आले आणि त्यांना सिगारेट दे म्हणाले.

crime update Mobile stolen grandfather from park police security needed in park
Pune Crime : चोरीच्या गुन्ह्यात अटक; विश्रामबाग पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये संपवले जीवन

त्यावर प्रभाकर यांनी माझ्याकडे सिगारेट नाही म्हणताच संशयितांनी पैशांची मागणी केली. दरम्यान पैसेही नाही म्हणताच दोघांनी प्रभाकर यांच्या हातावर, मांडीवर, पाठीवर स्क्रु ड्रायव्हर सारख्या धारदार वस्तूने वार केले आणि प्रभाकर यांना दमदाटी करत बळजबरीने मोबाईल हिसकावून नेला.

crime update Mobile stolen grandfather from park police security needed in park
Chhtrapati Sambhaji Nagar : पुढील आदेशापर्यंत शहराच्या नावात बदल नको; जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय

घटना घडली तेव्हा उपस्थित होते बघे!

विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा इतरही काही नागरिक उद्यानात आलेले होते, मात्र आरोपींनी धारदार वस्तूने वार केल्याचे पाहून कोणी त्यांना अडविले नाही, अथवा कोणी धावही घेतली नाही, यावरुन आरोपींना आपले कोणीच काही करु शकत नाही असा अर्विभाव तयार झाला. मुळात गार्डन परिसरात सायंकाळच्या सुमारास तरी पोलिसांची गस्त हवी होती, ती का नाही असा सवाल या घटनेनंतर उपस्थित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com