
छत्रपती संभाजीनगर : यंदा खरीप हंगाम लांबल्याने रब्बी पिकांची पेरणी उशिरा झाली. असे असले तरी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून चार डिसेंबरअखेर जवळपास १८ लाख ११ हजार ८१३ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरले आहेत. त्यामुळे यातून जवळपास ११ लाख ९५ हजार २०७ हेक्टरवरील क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे.