मंठा तालुक्यात खरीपाचे जवळपास नव्वद टक्के क्षेत्रावरील पिकाचे नुकसान. उडीद, मूग, सोयाबीन ही पिके हातातून गेली, तर कपाशीचे जेमतेम वीस टक्के उत्पादन मिळेल.

मंठा तालुक्यात खरीपाचे जवळपास नव्वद टक्के क्षेत्रावरील पिकाचे नुकसान.  उडीद, मूग, सोयाबीन ही पिके हातातून गेली, तर कपाशीचे जेमतेम वीस टक्के उत्पादन मिळेल.
Published on
मंठ्यात ९० टक्के खरीप बाधित मंठा, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्रावरील ९० टक्के खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या पीक पंचनामे सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दयानंद वाघमोडे यांनी दिली. यंदा पावसाअभावी तालुक्यात उडीद व मूग या पिकांची पेरणी झाली नाही. कपाशी, सोयाबीन आणि तूर या खरीप पिकांची ६६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. सुरवातीला पिकांची उगवण चांगली झाली. मात्र, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने हिरवीगार पिके करपून गेली. पाणीसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाच्या साह्याने काही प्रमाणात पिके जगविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मंठा शहर व परिसरात सोमवारी (ता. २१) दुपारी दमदार पाऊस झाला. मात्र, तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला नाही. तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना व पूर्णा या दोन्ही नद्यांना पूर आला नाही. ओढे-नालेही वाहिले नाहीत. जलसाठे, विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा हिवाळ्यातच पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप पिके हातातून गेल्यात जमा असताना आता दमदार पावसाची गरज आहे. चांगला पाऊस झाल्यास जलसाठे, विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊन रब्बी पिकांना फायदा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com