
उपजिल्हा रुग्णालयांत सीटी स्कॅन बसविण्यात येणार : मंत्री राजेश टोपे
कसबेतडवळे : महिनाभरात राज्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या बाबतचे टेंडरही काढण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.
हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशन; संसदेत आज आर्थिक पाहणी अहवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा एस. पी. शुगरचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी रोज ३०० टन गाळप क्षमता असलेला सोयाबीन सॉल्व्हंट प्लांट कसबेतडवळे येथे उभारला आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (ता. ३०) आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे होते. आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते विक्रम पडवळ आदी उपस्थित होते.
श्री. टोपे म्हणाले, ‘‘राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणीच सीटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा भार हा एकाच सीटी स्कॅन यंत्रणेवर पडतो. परिणामी, रुग्णांना वेळेत सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. याची परिचित कोरोना काळात आली. यासाठी तालुकास्तरावरील सर्व उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन यंत्रणा महिनाभरात बसविली जाईल. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने सहा हजार कोटी रुपये कर्जाची तरतूद केली.
हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी
राज्यातील सर्व ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सोयीसुविधांची उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत’’, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार काळे, राज्यमंत्री बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. दीपक मुळूक यांनी सूत्रसंचालन केले.
सुरेश पाटील यांनी एस. पी. सोयाबीन सॉल्व्हंट प्लांटची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ऑक्टोबर २०२३ पर्यंत बीड जिल्ह्यामधील घाटसाळवी येथे ३,५०० टन क्षमतेचा साखर कारखाना, ९० केलपीडी इथेनॉल प्रकल्प व १४ एमडब्ल्यू सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात कामाला सुरवात होईल’.
Web Title: Ct Scan To Be Installed In Sub District Hospitals Minister Rajesh Tope
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..