यंदा गावरान मेवा सीताफळाची

यंदा गावरान मेवा सीताफळाची
Published on: 
गावरान सीताफळाचे उत्पादन घटले जळकोट, ता. १७ (बातमीदार) : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावरान सीताफळाचे उत्पादनही घटले आहे. तालुक्यातील डोंगररांगांमध्ये, शेताच्या बांधावर आणि रानावनात नैसर्गिकरीत्या सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही झाडे फळांनी लगडतात. त्यामुळे बाजारात गावरान सीताफळाची मोठी आवक होते. गोड, सुगंधी आणि चविष्ट असलेल्या या फळाची ग्राहक आतुरतेने वाट पाहतात. मात्र, यंदा चित्र वेगळे आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके करपली आहेत. पुरेसा ओलावा न मिळाल्याने सीताफळाच्या झाडांची वाढ खुंटली, फुलधारणा झाली नाही. काही झाडांना लागलेली फळेही आकाराने लहान राहून गळून पडली. परिणामी, सीताफळाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. सीताफळ हा अनेक गरीब कुटुंबांसाठी हंगामी उत्पन्नाचा स्रोत आहे. ग्रामीण भागातील महिला, मुले आणि अन्य नागरिक रानातून सीताफळे गोळा करून ती पिकवतात व विविध बाजारपेठांत विक्रीसाठी नेतात. एका हंगामात एका कुटुंबाला यातून १५ ते २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. यंदा फळेच उपलब्ध नसल्याने हे उत्पन्न बुडाले आहे. ----- फळझाडांचे संवर्धन आवश्यक सीताफळाच्या झाडांना फळधारणेसाठी जून-जुलैमध्ये चांगला पाऊस आणि जमिनीत ओलावा टिकणे आवश्यक असते. यंदा पावसाने ओढ दिल्याने फळांची वाढ झाली नाही. हवामान बदलाचाही यावर परिणाम होत असून, जंगलातील फळझाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.