
Somnath Suryawanshi
sakal
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात दाखल याचिकेत शुक्रवारी (ता. १२) सुनावणी झाली. कोठडीतील मृत्युच्या संदर्भात गाईडलाईन फ्रेम करण्याच्या संदर्भात मुख्य सचिवांनी ३ ऑक्टोबरपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, न्यायमूर्ती हितेन एस. वेनेगावकर यांनी दिले.