तेरणात दांडिया महोत्सव

तेरणात दांडिया महोत्सव
Published on: 
फोटो क्रमांक- OSM26B07216 धाराशिव ः तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात जनरल ॲक्टिव्हिटी ॲन्ड स्टुडंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित दांडिया महोत्सवात विविध वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करताना विद्यार्थिनी. ...................... ‘तेरणा’मध्ये दांडियाचा रंगारंग उत्सव; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव धाराशिव, ता. १७ (बातमीदार) : तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जनरल ॲक्टिव्हिटी अँड स्टुडंटस असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (ता. १५) दांडिया महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत झालेल्या या महोत्सवात महिला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, दांडिया-गरबा नृत्य आणि मनोरंजक स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत आणली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाला सुरवात झाली. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने, बीएसएच विभागप्रमुख डॉ. उषा वडणे, फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने आणि जीएएसएच्या समन्वयक डॉ. राजश्री यादव यांच्यासह महिला प्राध्यापक उपस्थित होत्या. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी दांडिया आणि गरबा नृत्याचे सादरीकरण केले. महोत्सवानिमित्त बेस्ट आउटफिट, बेस्ट परफॉर्मन्स आणि बेस्ट कपल या स्पर्धा घेण्यात आल्या. बेस्ट आउटफिटचा पुरस्कार फार्मसी गर्ल्स ग्रुपला, तर बेस्ट परफॉर्मन्सचा पुरस्कार हॉस्टेल गर्ल्स ग्रुपला मिळाला. बेस्ट कपलचा पुरस्कार वर्षा गुंड आणि साक्षी गरड या जोडीला प्रदान करण्यात आला. महिला प्राध्यापकांमधून प्रा. ऐश्वर्या सक्राते आणि प्रा. वर्षा बोंदर यांना उत्कृष्ट सादरीकरणासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्राचार्य डॉ. माने यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. राजश्री यादव यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली, तर प्रा. ऐश्वर्या सक्राते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. यादव यांनी आभार मानले. प्रा. अक्षता हाजगुडे, प्रा. सायली पवार, प्रा. सुकेशनी घनगावे, प्रा. प्रेरणा पाटील यांच्यासह रामेश्वर मुंडे, दिगंबर जाधव आणि सोमनाथ कोरके यांनी सहकार्य केले. सुरक्षा पथकाने अविनाश सरवदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com