

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेची शाळा म्हटले, की पालक नाके मुरडतात. आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पालकांचा आटापिटा सुरू असतो. आता मात्र पालकांवर ही वेळ येणार नाही. कारण आता जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी केवळ शिक्षण घेणारा नको, तर तो संस्कारक्षम बनला पाहिजे, यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.