
छत्रपती संभाजीनगर : बन्सीलालनगर भागातील गोविंदनगर येथे चोरट्यांनी भर दुपारी घरफोडी करत १५ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. दुपारी एक ते तीन वाजल्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. घरमालक दुपारी जेवायला बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी डाव साधला. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.