
वसमत : वसमत येथील श्रीनगर भागात भरदिवसा शिक्षकाचे घर फोडून दागिने व रोख रक्कम पळविल्याची घटना गुरुवारी ता. ७ घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील श्रीनगर भागात पवन शर्मा यांचे घर आहे. पवन हे औंढा नागनाथ तालुक्यातील एका शाळेवर शिक्षक आहेत. नेहमी प्रमाणे सकाळीच शाळेत गेले होते. तर त्यांची आई व पत्नी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलुप लाऊन बाहेर गेल्या होत्या.