दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना कर्जवसुलीचा तगादा नको अन्यथा कायदेशीर कारवाई

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना  कर्जवसुलीचा तगादा नको  अन्यथा कायदेशीर कारवाई
Published on: 
दुष्काळाच्या संकटात कर्जवसुलीचा तगादा नको अन्यथा कायदेशीर कारवाई, जिल्हा प्रशासनाचा इशारा सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता.४ : सध्याच्या दुष्काळी कठीण परिस्थितीत कर्जवसुलीचा तगादा लावून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर देऊ नका, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व मायक्रो फायनान्स कंपन्या, मल्टिस्टेट पतसंस्था आणि बँकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली पूर्णपणे टाळावी, तसेच त्यांच्यावर कोणताही मानसिक दबाव न आणता सहानुभूतीपूर्वक सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयांनुसार, जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा आणि उमरगा हे सर्व आठ तालुके दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व त्यांच्या कुटुंबांसमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ....... ((पॉईंटर)) प्रशासनाचे प्रमुख निर्देश - जिल्ह्यातील सर्व बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांच्या वसुली अधिकारी व एजंट्सनी सक्तीची व बेकायदेशीर वसुली थांबवावी. - शासनाच्या धोरणानुसार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याची तरतूद आहे. - कर्जाची परतफेड हा व्यवहाराचा भाग असला तरी, दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना त्रास न देता त्यांच्याशी संयमाने व संवेदनशीलतेने वागावे. - वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचू नये आणि कायदेशीर चौकटीतच कार्यवाही करावी. ........... ((चौकट)) नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर बडगा कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना धमकावणे, मानसिक त्रास देणे किंवा नियमबाह्य पद्धतीने सक्ती करणे यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ चौकशी केली जाईल. तपासणीमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे. .............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.