मुलींची कमी होणारी संख्या ‘नकोशी’ ; राज्यात तीन वर्षांत लिंग गुणोत्तरात आठने घट

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मागील काही वर्षांत बेकायदेशीररीत्या लिंग निदानाचे प्रमाण वाढले
declining sex ratio in india by 8 percent
declining sex ratio in india by 8 percent Sakal

छत्रपती संभाजीनगर : देशात मागील काही वर्षांत मुलींची घटणारी संख्या चिंतेची बाब झाली आहे. महाराष्ट्रातही हीच स्थिती असून, २०२०-२१ मध्ये एक हजार मुलांमागे ९४० इतकी असलेली मुलींची संख्या २०२२-२३ मध्ये घटून ९३२ वर आली आहे. २०२१-२२ मध्ये ही संख्या ९३३ होती. मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात लिंग गुणोत्तरात सरासरी आठने घट झाली आहे.

दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेल्या स्त्रियांच्या प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हटले जाते. २०११ च्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.

मात्र, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मागील काही वर्षांत बेकायदेशीररीत्या लिंग निदानाचे प्रमाण वाढले. त्यामुळे ‘मुलगाच हवा’ या मानसिकतेनुसार मुलीचा गर्भ खुडला जातो. तसेच ‘हम दो हमारे दो,’ ‘हम दो हमारा एक,’ ‘लहान कुटुंब’ या संस्कृतीत मुलगा हवाच अशी अनेकांची मानसिकता झालेली असते. याचा परिणाम लिंग गुणोत्तरावर झालेला दिसतो.

देशांत अनेक राज्यांत असमतोल लिंग गुणोत्तर असल्याने तेथे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. लिंग गुणोत्तराचे प्रमाण अशाच प्रकारे घटत राहिल्यास यात समाजाचा समतोल बिघडू शकतो. सध्या कित्येक समाजांत मुलींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने लग्नासाठी मुलीच नाहीत अशी स्थिती आहे.

या राज्यात मुलींच्या संख्येत घट

२०२०-२१ च्या तुलनेत देशात २०२२-२३ या वर्षात बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालँड, पश्‍चिम बंगाल या राज्यांत मुलींची संख्या घटली आहे. तर, लडाख या केंद्रशासित प्रदेशात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. तेथील २०२२-२३ मधील लिंग गुणोत्तर एक हजार मुलांमागे १ हजार २३ मुली असे आहे.

देशभरातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण

राज्य २०२०-२१ -२०२१-२२- २०२२-२३

महाराष्ट्र- ९४०- ९३३ -९३२

आंध्र प्रदेश- ९४५ -९५२- ९४५

अरुणाचल प्रदेश -९३१- ९३३- ९३२

आसाम- ९४२ -९४४- ९५१

बिहार- ९१७- ९१५ -८९५

छत्तीसगड -९६५- ९६१ -९५८

दिल्ली -९२७- ९२४ -९१६

गोवा -९४९- ९५३- ९५६

गुजरात -९१८- ९२७ -९२८

हरियाना- ९२७- ९२० -९१८

हिमाचल प्रदेश- ९४४- ९४१ -९३२

जम्मू काश्‍मीर -९३३ -९४० -९४५

झारखंड -९३५ -९३५ -९३४

कर्नाटक -९४९- ९४०- ९४५

केरळ -९५८ ९६८- ९६५

मध्य प्रदेश -९३९ -९२९ -९३२

ओडिशा -९३६ -९३८ -९३६

पंजाब -९२६ -९२८ -९२७

राजस्थान -९४६ -९४६ -९४६

तमिळनाडू -९४८ -९४७ -९४७

उत्तर प्रदेश -९३२ -९३४ -९३६

उत्तराखंड -९४० -९३९ -९४४

पश्‍चिम बंगाल -९४९ -९४३ -९३२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com