फोटो
जालना ः दीपक रणनवरे यांचे उपोषण सोडवताना भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी. (छायाचित्र ः किरण खानापुरे)
----
ब्राह्मण समाजाच्या मागण्यांवर बैठक होणार
--
जालन्यात दीपक रणनवरे यांचे उपोषण सातव्या दिवशी स्थगित
---
सकाळ वृत्तसेवा
जालना, ता. ४ ः ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दीपक रणनवरे यांचे येथे सहा दिवसांपासून उपोषण सुरू होते. मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चेचे आश्वासन मिळाल्याने शुक्रवारी (ता.चार) त्यांनी उपोषण तूर्त स्थगित केले. यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी समन्वय साधला.
रणनवरे यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राम कुलकर्णी यांनी दखल घेत त्यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्यांचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर कुलकर्णी येथे दाखल झाले व रणनवरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शासनाच्या संबंधित विभागांपर्यंत मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवासी जिल्हाधिकारी रामदास दौंड, पोलिस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी, तहसीलदार धैर्यशील गवळी उपस्थित होते.
अंबाजोगाई पेशवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा. राहुल कुलकर्णी, डॉ महेश अकोलकर, योगेश जानतीकर, संजय देशपांडे, मधुसूदन दंडारे, आर.आर. जोशी, अरविंद देशपांडे, दिलीप जोशी, ॲड बळवंत नाईक, भूषण जोशी, राहुल याज्ञिक, अनिल दीक्षित, सिद्धिविनायक मुळे, विलास कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, संतोष दाणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो
मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक
--
ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मुंबईत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रणनवरे यांनी उपोषण स्थगित केले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून देणे, महामंडळावर अशासकीय सदस्य व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा, ईडब्ल्यूएस आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढविणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे मोफत सुरू करणे आदी मागण्या रणनवरे यांनी केल्या होत्या.
----
JL126B07739