
छत्रपती संभाजीनगर : पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले होते. मात्र, हे काम वेळेत न झाल्याने दाखल अवमान याचिकेत प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. संदीपकुमार सी. मोरे यांनी दिले आहेत.