वाया गेलेली खरीप पिके काढणीला,
तरीही ई-पीक पाहणी लटकलेलीच
- जिल्ह्यात ३ लाख ६० हजार २९७ प्लॉटचे सर्वेक्षण बाकी
- शेतात पीक न राहिल्यास ई-पीक पाहणी कशी करणार?
- पुरावाच न उरल्यास दुष्काळी मदत, पीकविम्यावर राहणार टांगती तलवार
..........
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १६ : जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सुकून गेलेली पिके काढण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली असून, मूग व उडदाची काढणीही सुरू आहे. खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाकडे दुष्काळी परिस्थितीचा अहवाल सादर झालेला असला, तरी जिल्ह्यातील ई-पीक पाहणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शेतातील पिकांची काढणी पूर्ण झाली आणि ई-पीक पाहणी राहून गेली, तर दुष्काळी मदत आणि पीकविमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय अहवालानुसार, बुधवारपर्यंत (ता. १६) जिल्ह्यातील एकूण ८ लाख ५५ हजार ३६३ प्लॉटपैकी ४ लाख ९५ हजार ६६ प्लॉटचे सर्वेक्षण झाले आहे. म्हणजेच अजूनही ३ लाख ६० हजार २९७ अर्थात ४०.८६ टक्के प्लॉटचे सर्व्हेक्षण होणे अजून बाकी आहे. दुसरीकडे सर्वेक्षण झालेल्या प्लाॅटचीही मंजुरीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यात एकूण अर्जांपैकी केवळ ३.१३ टक्के (२६ हजार ८०७ प्लॉट) अर्जांनाच मंजुरी मिळाली असून ४ लाख ६८ हजार २५९ अर्ज मंजुरीअभावी प्रलंबित आहेत.
..............................
((((((((((चौकट))
तालुकानिहाय ई-पीक पाहणीची स्थिती ः (१६ अखेर)
तालुका...एकूण प्लॉट...सर्वेक्षण झालेले प्लॉट...सर्वेक्षण टक्के...मंजुरी प्रलंबित...मंजूरी पूर्ण भूम...१,२२,०३२...५९,९७९...५१.७०...५७,४२५...२,५५४
धाराशिव...१,४४,९७४...६९,४७९...५१.९६...६८,३७३...१,१०६
कळंब...१,२८,४२८...८२,०१६...६३.८६...७९,६६३...२,३५३
लोहारा...४८,२७३...३०,५२२...६३.२३...२७,५०५...३,०१७
उमरगा...१,०४,९५७...७४,१५६...७०.६५...६५,५९५...८,५६१
परंडा...९४,२८७...३४,९७५...३७.५०...३२,५१४...२,४६१ तुळजापूर...१,२९,३७८...८९,७१६...६९.३४...८६,५१६...३,२००
वाशी...८३,०३४...५४,२२३...६५.३०...५०,६६८...३,५५५
एकूण (जिल्हा)...८,५५,३६३...४,९५,०६६...५९.१४...४,६८,२५९...२६,८०७
...........................................................
((चौकट))
ॲपद्वारे स्वतः करा पीक नोंदणी
ई-पीक पाहणीचे काम अधिक जलद करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या डीसीएच-एमएच मोबाइल ॲपमध्ये शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी करण्याची सुविधा शुक्रवारपासून (ता. ११) उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये DCS ॲप डाऊनलोड करून स्वतःचा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) प्रविष्ट करून, त्या क्रमांकाशी संलग्न असलेल्या सर्व शेतजमिनींच्या पिकांची नोंद स्वतः करू शकतात. पीक नोंदणीची अचूक माहिती विविध शासकीय अनुदान, विमा भरपाई व इतर योजनांच्या लाभासाठी अनिवार्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी विलंब न करता डीसीएच-एमएच मोबाईल ॲपद्वारे ई-पीक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.