सुविधायुक्त स्मशानभुमीसाठी
पालकमंत्री बोर्डीकरांना निवेदन
-----------------------
पूर्णा, ता.२ (बातमीदार) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही स्मशानभुमीसाठी आवश्यक सुविधा, शेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे तत्काळ या प्रश्नी दखल घेऊन शेडसह सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपच्या वतीने पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळा, उन्हाळा तसेच प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत ही समस्या अधिक गंभीर होते. मृत व्यक्तीला सन्मानाने अंतिम निरोप देण्यासाठी प्रत्येक गावात मूलभूत सुविधा असलेली स्मशानभूमी असणे ही काळाची गरज आहे. या सामाजिक आणि संवेदनशील प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील विविध गावांत स्मशानभूमीचे शेड व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे करण्यात आली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली
((कोट)))
सामान्य नागरिकांच्या सन्मानाचा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे. शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, '' जिवंतपणी सुविधा आणि मृत्यूनंतर सन्मानाने अंतिम निरोप हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
-संजय मोहिते,
तालुकाध्यक्ष, भाजप, पूर्णा
----------