esakal | डेंगी, चिकनगुन्याने काढले ग्रामीण भागात डोके वर
sakal

बोलून बातमी शोधा

dengue

डेंगी, चिकनगुन्याने काढले ग्रामीण भागात डोके वर

sakal_logo
By
सुनिल इंगळे

औरंगाबाद: पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असून ग्रामीण भागात डेंगी आणि चिकनगुनिया या आजाराने डोके वर काढले आहे. दरम्यान जिल्ह्यात डेंगीचे १३ तर चिकनगुनियाचे १६ रुग्ण आढळले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने विशेष भर देऊन गावागावात जाऊन जनजागृती करण्याचे काम सुरू असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहे. जून महिन्यात २९ हजार ५७७ रक्ताचे नमुने घेण्यात आले. यात एकही मलेरियाचा रुग्ण आढळलेला नाही. तसेच एप्रिल महिन्यात ७९ हजार ९७९ रक्ताचे नमुने घेतले आहेत. दरम्यान एप्रिल ते जुलै महिन्यात ६० रक्ताचे नमुने घेतले असून यात १३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर चिकनगुनियाचे २७ नमुन्यांपैकी १६ नमुने हे सकारात्मक आले आहे.

तसेच खाजगी रुग्णालयात ५० रुग्णावर उपचार सुरू असल्याचे डॉ. धानोरकर यांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यात कोठेही डेंग्यू आजाराचा उद्रेक झाल्याची स्थिती नाही. दरम्यान साथ रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी पाणी साचू देवू नका, स्वच्छता राखा, आजारी असल्यास अथवा लक्षणे असल्यास त्वरीत रुग्णालयात जावून उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: कोरोना योद्ध्यांच्या मुलांचे शिक्षण थांबले, कोणी उधारही देईना

दरम्यान कीडजन्य आजार या संदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. यात आठवड्यातुन एक दिवस ड्राय-डे पाळावा, अंगभर कपडे घालावेत, मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्यात डासांच्या आळ्या मारण्यासाठी अबेट लिक्विड टाकने, धूर फवारणी करणे, पाण्याच्या डबक्याच्या ठिकाणी गप्पी मासे टाकण्यात येत आहे.

loading image
go to top