Ghati Hospital : बाळा, आम्हाला माफ कर! घाटी रुग्णालयाच्या अधीक्षक दालनापुढे प्रसूती, दाखल करून घ्या म्हणून दोन तास माता फिरली
Chh. Sambhajinagar News : घाटी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेची प्रसूती वैद्यकीय अधीक्षक दालनासमोरच झाली. दोन तास धावपळ करूनही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही.
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनासमोर भर रस्त्यात प्रसूती झाली. जन्मताच आईसह या कोवळ्या जिवाला व्यवस्थेमुळे यातना मिळाल्या.