
हेर : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोहारा, नरसिंगवाडी (ता. उदगीर) परिसरातील शेतशिवाराची पाहणी केली होती. मात्र, अजूनही या गावांतील अनेक शेतकऱ्यांना पीकविण्याचा छदामही मिळालेला नाही. विविध विभागांना निवेदने देऊनही उपयोग झालेला नाही.