Chh. Sambhajinagar News: चार पोलिस असूनही विद्यार्थ्याला लुटले; सिडकोतील प्रकार,तीन मुख्य चौकांत लूटमारीच्या वाढत्या घटना
Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात दोन दिवसांत तीन लूटमार घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सिडको आणि पंचवटी परिसरात पोलिस असतानाही ही धक्कादायक प्रकार घडले.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रमुख चौकाचौकात पोलिस दिवसरात्र ड्यूटीवर असूनही लूटमारीच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शहर परिसरात दोन दिवसांत तीन लुटीच्या घटना घडल्या असून आता घराबाहेर पडायचे की नाही अशी भीती व्यक्त होत आहे.