Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात पावसातही ५७३ टॅंकर सुरू; सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
Monsoon Update : मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात अजूनही ३७० गावे आणि १४९ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक १८४ गावे टंचाईग्रस्त आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. तरीही अद्याप अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष कायम आहे. मराठवाड्यात ३७० गावे आणि १४९ वाड्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.