
उस्मानपुरा : विधानसभा निवडणुकीत भाजप, महायुतीला बहुमत मिळाले. यानंतर बुधवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांचे नाव जाहीर होताच उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालय परिसरात पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. दरम्यान, भाजपचे काही प्रमुख पदाधिकारी मुंबईत शपथविधी कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत.