
देवगाव : रामनवमीच्या मुहूर्तावर देवगाव (ता. पैठण) येथील रेशीम मंडळाने गावातील सर्वोत्कृष्ट रेशीम कोष उत्पादक दांपत्याच्या सत्काराची परंपरा सुरू केली आहे. रविवारी (ता. सहा) पहिल्यांदा तीन रेशीम कोष उत्पादक दांपत्याचा सन्मानपत्र, रोख रक्कम, साडी-चोळी देऊन गौरव करण्यात आला.