धाराशिव ते जालना रेल्वे मार्ग

धाराशिव ते जालना रेल्वे मार्ग
Published on: 
धाराशिव-जालना रेल्वे बीडमार्गे न्यावी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीची रेल्वेमंत्र्यांची घेणार भेट ----- बीड, ता. १८ : जिल्ह्याला रेल्वेने जोडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी मार्गाचा आधार देत धाराशिव-जालना रेल्वेमार्ग बीडमार्गे न्यावा, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी समितीचे पदाधिकारी डिसेंबरमध्ये दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर समितीची बैठक सोमवारी अध्यक्ष जवाहरलाल मदनलाल सारडा यांच्या निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत रेल्वेमार्गाच्या विविध पर्यायांसह जिल्ह्याच्या रेल्वेविषयक मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सुरवातीला परळी रेल्वेमार्गासह धाराशिव ते जालना रेल्वेमार्गाचा पर्याय विचारात घेण्यात आला. मात्र, धाराशिव ते येडशी रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने येडशीपासून पुढे जालन्याकडे जाणारा रेल्वेमार्ग बीडमार्गे न्यावा, अशी सुधारित मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्याचे बैठकीत ठरले. रेल्वेमार्गाची मागणी केवळ चर्चेपुरती मर्यादित न ठेवता त्यासाठी ठोस पाठपुरावा करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. यासाठी समितीच्या जास्तीत जास्त सदस्यांनी दिल्ली दौऱ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. डिसेंबरमध्ये रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बीड जिल्ह्याची रेल्वे जोडणी आणि विविध प्रलंबित मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.