बोरी शिवारातून शेतीसाहित्य चोरी
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील बोरी शिवारातून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचे शेतीसाहित्य चोरून नेले आहे. चोरट्यांनी शेतातील २८० फूट पाइप, २८० फूट केबल आणि २८० फूट नायलॉन रस्सी चोरली. याप्रकरणी शेतकरी राजपाल शिवाजी नागटिळक (वय ३४, रा. बोरी) यांनी शनिवारी (ता.१४) दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
-----
३४ हजारांचा ऐवज चोरणारे जेरबंद
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ठाकरेनगरसमोरील रस्त्यावर गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ३४ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. शनिवारी (ता. १४) दुपारी संशयित आरोपी सूरज कैलास अवघडे (रा. लातूर) आणि हुसेन आयुब शेख (रा. पातूर, जि. अकोला) यांनी शिवानंद निकम यांचा मोबाइल व रोख रक्कम, तसेच सुनील चौधरी यांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी बालाजी दिगंबर जाधव (रा. शिरगापूर) यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
शहरातून दुचाकी चोरीला
धाराशिव : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या काळा मारुती चौक परिसरातून चोरट्याने ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे. अर्जुन नरसिंग गरड (वय ३०) यांची दुचाकी बँक ऑफ बडोदा समोरील रस्त्यावर उभी होती. मंगळवारी (ता.१०) ते बुधवारी (ता.११) सकाळी सहाच्या सुमारास ही चोरी झाली. गरड यांच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.