नोंदणी करणे आवश्‍यक

नोंदणी करणे आवश्‍यक
Published on: 
धाराशिव जिल्ह्याची ‘मॉडेल डिस्ट्रिक्ट’ म्हणून निवड शासकीय, खासगी संस्थांनी एचएफआर, एचपीआरमध्ये नोंदणी करणे आवश्यक ----- धाराशिव, ता. १५ (बातमीदार) : राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (भारत सरकार) आणि आयुक्त, आरोग्य सेवा (मुंबई) यांच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्याची आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत ‘मॉडेल डिस्ट्रिक्ट’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टअंतर्गत येणाऱ्या खासगी आरोग्य संस्थांनी हेल्थ फॅसिलिटी रजिस्टर (एचएफआर) आणि हेल्थ प्रोफेशनल रजिस्टर (एचपीआर) मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा मुख्य उद्देश रुग्णांचा वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणे आणि आरोग्यसेवा अधिक सुलभ करणे हा आहे. या मिशनच्या माध्यमातून रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालयांना एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडण्यात येणार आहे. देशातील नागरिकांसाठी १४ अंकी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (आभा) आयडी तयार करणे, जुने वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन आणि तपासणी अहवाल डिजिटल स्वरूपात जतन करणे, तसेच रुग्णालये व डॉक्टरांमध्ये आरोग्यविषयक माहितीची सुरक्षित देवाणघेवाण करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे. रुग्णाच्या संमतीशिवाय त्याची आरोग्यविषयक माहिती कोणाशीही शेअर केली जाणार नाही. माहितीची सुरक्षितता आणि रुग्ण तसेच आरोग्य संस्थांची गोपनीयता राखण्याला मिशनमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांची एचएफआरमध्ये, तर तेथील वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफची एचपीआरमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याची कार्यवाहीही दररोज सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आरोग्य संस्थांनीही एचएफआर आणि एचपीआरमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांनी पुढाकार घेऊन सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. या मिशनमुळे रुग्ण आणि आरोग्य संस्थांच्या माहितीची गोपनीयता व सुरक्षितता राखली जाणार आहे. तसेच, शासनाकडून खासगी आरोग्य संस्थांवर कोणतेही नियंत्रण ठेवले जाणार नसल्याने नोंदणीबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नगरपालिका क्षेत्रासह तालुका आणि ग्रामीण भागांतील खासगी रुग्णालये, दवाखाने, डायग्नोस्टिक सेंटर, प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर आणि इमेजिंग सेंटर (एक्स-रे, एमआरआय) यांनी एचएफआरमध्ये, तर संबंधित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफने एचपीआरमध्ये नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.