धाराशिवला ना पार्किंगचे धोरण ना वाहतुकीची शिस्त

धाराशिवला ना पार्किंगचे धोरण ना वाहतुकीची शिस्त
Published on: 
ना पार्किंगचे धोरण, ना वाहतुकीची शिस्त - अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे धाराशिवकर त्रस्त - प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बेशिस्त कारभार ......... सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १८ ः शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजीमंडई परिसर, बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नगरपालिका ते बसस्थानक या अत्यंत वर्दळीच्या मार्गांवर अनधिकृत पार्किंग व बेसुमार अतिक्रमणांमुळे रस्त्यांचा पूर्णपणे कोंडमारा झाला आहे. वाहतुकीच्या कोणत्याही शिस्तीचा पत्ता नसलेला हा मनमानी कारभार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. रस्ते गिळंकृत करणारे अतिक्रमण शहरातील बहुतांश व्यावसायिक गाळे, दुकाने आणि इमारतींसमोरील रिकाम्या जागांवर टपऱ्या, हातगाड्या आणि व्यावसायिकांच्या साहित्याने अतिक्रमण केले आहे. परिणामी, वाहने उभी करण्यासाठी कोणतीही अधिकृत जागा उरलेली नाही. दुचाकी व चारचाकी चालक नाइलाजास्तव रस्त्यावरच वाहने पार्क करून निघून जात असल्याने शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे मंदावली असून ठिकठिकाणी ‘ट्रॅफिक जॅम’चे दृश्य पाहायला मिळत आहे. शहरातील या अनागोंदी कारभारावर वाहतूक पोलिस आणि नगरपालिका प्रशासन कधी अंकुश ठेवणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून, तातडीने वाहतूक धोरण आखून कारवाई करण्याची मागणी होत आहे. ........ ((पॉईंटर)) महत्त्वाच्या मार्गांची लागली ‘वाट’ - पोस्ट ऑफिस ते नेहरू चौक : मुख्य बाजारपेठेतील या पट्ट्यात अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगमुळे रस्ता अरुंद झाला आहे. एखादे चारचाकी वाहन मध्यभागी आले तरी संपूर्ण वाहतूक ठप्प होते. - बार्शी नाका ते लेडीज क्लब : सिमेंट काँक्रिटच्या नवीन रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जातात. रस्त्याची उंची वाढल्याने दुकाने खोलगट भागात गेली आहेत, ज्यामुळे वाहनचालक थेट रस्त्यावरच गाड्या लावत आहेत. - तेरणा कॉलेज ते तुळजापूर नाका : या पट्ट्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील, पंचायत समिती, न्यायालय, नगरपालिका आणि बाजार समिती यासारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. कामानिमित्त शहर व ग्रामीण भागातून दररोज हजारो नागरिक येतात. मात्र, व्यावसायिक इमारतींनी पार्किंगची कोणतीही व्यवस्था न केल्याने नागरिकांना रस्त्यालगतच वाहने लावावी लागतात. ........ पायी जाणाऱ्यांच्या जिवाशी खेळ रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर वाहनांचा पूर्ण ताबा असल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. परिणामी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना थेट वर्दळीच्या रस्त्यावरून जिवाची बाजी लावून वाट काढावी लागत आहे. वाहनचालकांच्या कट मारून जाण्याच्या प्रकारामुळे नेहमीच अपघाताची भीतीत चालावे लागत आहे. ........... ((कोट)) रस्त्यावर वाहने लावणे अनधिकृत आहे. नगरपालिकेने पार्किंगचे नियोजन केले पाहिजे. तरीही अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर नियमितपणे कारवाई सुरूच आहे. - अरविंद हिंगोले, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस, धाराशिव ........ ((कोट)) शहरात पार्किंगची व्यवस्था व्हावी, यासाठी विकास आराखड्यात ५ ते ६ जागा नियोजित केलेल्या आहेत. काही जागांचा ठराव झाला आहे. ताबा घेण्याची प्रक्रिया होणे बाकी आहे. बस स्टॅंडसमोर पार्किंग जागेचा प्रस्ताव पाठविणे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो पाठविण्यात येणार आहे. - प्रकाश पवार, रचनाकार, नगरपालिका, धाराशिव ........ ((कोट)) आधीच रस्ते अरुंद आहेत. त्यातील अर्धे रस्ते अनधिकृत पार्किंगने झाकून जातात. शाळा सुटल्यानंतर तर वाहतूक कोंडी कायम होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा त्यामुळे धोक्यात आहे. रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकला तर पार्किंग रस्त्याच्या खाली होईल. सामन्य नागरिकांना रहदारीचा मोठा त्रास आहे. नगरपालिकेने लक्ष द्यायला हवे. - डाॅ. रोहन झाडे, नागरिक, धाराशिव ......... धाराशिव ः बार्शी नाका ते लेडीज क्लब दरम्यानच्या रस्त्यावर उभी केलेली वाहने. फोटो ःOSM26B07414 ........ धाराशिव ः पोस्ट ऑफिस ते नेहरू चौकादरम्यानचा आधीच अरुंद असलेला रस्ता अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणामुळे असा आकुंचन पावला आहे. फोटो ःOSM26B07415 ........ धाराशिव ः बसस्थानकासमोर मुख्य रस्त्यावर वाहने लागल्याने मोठी वाहने तसेच पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. फोटो ःOSM26B07416 ....... धाराशिव ः जिल्हा न्यायालयाच्या बाजूच्या अरुंद रस्त्यावर दुतर्फा पार्क केलेल्या दुचाकींची गर्दी झाल्याने वाहनासाठी रस्ताच उरलेला नाही. फोटो ःOSM26B07417

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.