अधिग्रहणाच्या मोबदल्याची प्रतीक्षा

अधिग्रहणाच्या मोबदल्याची प्रतीक्षा
Published on: 
(एक मेन)) विहिरी, कूपनलिकांवर ४४ गावकऱ्यांची तहान पण शेतकऱ्यांचा मोबदला चार महिन्यांपासून थकीत --------- धाराशिव, ता. ६ (बातमीदार) : उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ४४ गावांसाठी अधिग्रहित केलेल्या खासगी विहिरी व कूपनलिकांच्या मोबदल्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. स्वतःच्या शेतातील पिकांचा विचार न करता गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. यंदाच्या मे आणि जून महिन्यात धाराशिव तालुक्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तालुक्यातील ४४ खासगी विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण केले. प्रशासनाच्या विनंतीला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या जलस्रोतांचे पाणी गावासाठी खुले केले. त्यामुळे संबंधित गावांना पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागविण्यात आली. नियमानुसार अधिग्रहित विहीर किंवा कूपनलिकेवर शेतकऱ्याचा स्वतःचा वीजपंप व अन्य साहित्य असल्यास प्रतिदिन ६०० रुपये, तर वीजपंप उपलब्ध नसल्यास प्रतिदिन ४५० रुपये मोबदला देण्यात येतो. मात्र, मे व जूनमध्ये अधिग्रहित केलेल्या विहिरी-कूपनलिकांचा मोबदला अद्याप एकाही संबंधित शेतकऱ्याला मिळालेला नाही. या दोन महिन्यांच्या थकीत मोबदल्यासाठी सुमारे २४ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबत पंचायत समिती स्तरावरून वरिष्ठ कार्यालयाकडे निधीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ............................ ((चौकट)) पाणी दिले, पण पैसे मिळाले नाही गावाची तहान भागविण्यासाठी स्वतःच्या शेतातील पिकांचा विचार न करता संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले. पण, या शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मोबदला मिळालेला नाही. सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत हक्काचा मोबदला वेळेत मिळाल्यास त्यांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. त्यामुळे शासन व वरिष्ठ प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून थकीत मोबदला वर्ग करावा, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com