धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बीडमध्ये भव्य मोफत संविधान ग्रंथ वाटप सोहळा संपन्न

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बीडमध्ये भव्य मोफत संविधान ग्रंथ वाटप सोहळा संपन्न
Published on: 
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त संविधान ग्रंथ वाटप बीड, ता. २३ (बातमीदार): प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड यांच्या विद्यमाने ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बीड तालुक्यातील शिवणी येथील महाविहार धम्मभूमी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगर येथे सातव्या अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेचे आयोजन नुकतेच अत्यंत उत्साहात करण्यात आले. या विशेष परिषदेचे औचित्य साधून संविधान फाउंडेशनच्या वतीने उपस्थित सर्व उपासक व उपासिकांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे मोफत वाटप करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संविधान फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचे दुग्धशर्करा योग साधून या भव्य मोफत संविधान ग्रंथ वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. याप्रसंगी डॉ. भदंत आनंद कौशल्य आणि पूज्य भिक्खू धम्मशील थेरो यांना धम्मदान अर्पण करण्यात आले. संविधान फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद वाघमारे, ससाने श्रीपाल, सुजल ससाने, डॉ. बबन जाधव, चंद्रकला सुतार, नयना नरहिरे, डॉ. पल्लवी पंडित, शकुंतला सुतार, स्नेहा बचुटे, अनिता धनवे, शीला मिसाळ, प्रियांका आचार्य, किशोर बिरलिंगे, मुंजा पानझडे, कविता वाव्हळ, सुषमा वडमारे, सुनीता रोडे, वैजंता वाघमारे, उषा कांबळे आणि शिवकन्या सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com