Fodder Crisis: धारूरमध्ये ४७ हजार जनावरांचा चारा प्रश्न ,चारा छावण्या कागदावरच; तालुक्यातील पशुपालकांवर जनावरे विकण्याची आली वेळ

Dharur Fodder Crisis: धारूर तालुक्यातील ४७ हजार १०९ जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा संपत आल्याने पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ येत असून, छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
Livestock in Dharur taluka face a severe fodder and water shortage amid drought conditions.

Livestock in Dharur taluka face a severe fodder and water shortage amid drought conditions.

esakal

Updated on: 

ईश्वर खामकर

किल्ले धारूर: किल्ले धारूर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि पशुपालकांना बसत आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरी अद्याप प्रत्यक्ष मैदानावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. पिण्याच्या पाण्यापाठोपाठ आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

तालुक्यात तब्बल ४७ हजार १०९ जनावरे असून, त्यांच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था कशी करायची, असा बिकट प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. चारा छावण्या सुरू करण्याबाबत अथवा चारा डेपो उभारण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल नसल्याने पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...