डायल ११२ वर खोटी माहिती देणे दोघांना भोवले; सोनपेठ पोलिसांकडून मोबाईल जप्त

डायल ११२ वर खोटी माहिती देणे दोघांना भोवले; सोनपेठ पोलिसांकडून मोबाईल जप्त
Published on: 
डायल ११२ वर खोटी माहिती देणे भोवले ----- सोनपेठ पोलिसांकडून दोघांचे मोबाइल जप्त ------ सोनपेठ, ता. ३१ (बातमीदार) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ या सेवेचा गैरवापर करून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या दोघांविरुद्ध सोनपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. या दोन्ही प्रकरणांत अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपासासाठी संबंधितांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. पहिली घटना १५ ऑक्टोबरला शेळगाव येथे घडली. डायल ११२ वर मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, चौकशीअंती मारहाणीची घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसरी घटना २६ ऑक्टोबरला शिरसी येथे घडली. येथेही दोनवेळा मारहाण होत असल्याची खोटी माहिती देऊन पोलिसांना बोलावण्यात आले. प्रत्यक्ष चौकशीत माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता कलम २१२ व २१७ अन्वये कारवाई करण्यात आली. न्यायालयाची परवानगी घेऊन पुढील तपास सुरू असून, खोटी माहिती देण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डायल ११२ ही आपत्कालीन मदतीसाठीची सेवा असून, वैयक्तिक वादातून किंवा जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन या सेवेचा गैरवापर करू नये. अशा प्रकारांमुळे पोलिस यंत्रणेचा वेळ व मनुष्यबळ विनाकारण खर्च होते आणि खऱ्या गरजू व्यक्तींना मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी डायल ११२ चा केवळ वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच वापर करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक गिते यांनी केले आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.