गणेशोत्सवापूर्वी दिव्यांगाना दोन महिन्यांचा भत्ता

गणेशोत्सवापूर्वी दिव्यांगाना दोन महिन्यांचा भत्ता
Published on
गणेशोत्सवापूर्वी दिव्यांगांना दोन महिन्यांचा भत्ता --- छत्रपती संभाजीनगर, ता. १२ : महापालिकेने दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांना गती दिली असून, गणेशोत्सवापूर्वीच लाभार्थींना दोन महिन्यांचा उदरनिर्वाह भत्ता वितरित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि दिव्यांग संघटनांकडून प्राप्त झालेल्या मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सध्या महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यापैकी दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता योजनेअंतर्गत ‘सक्षम’ ॲपद्वारे एकूण ५,२४० लाभार्थींची नोंदणी झाली. यातील ४,८९३ लाभार्थींना यापूर्वीच लाभ वितरित करण्यात आला आहे. बैठकीच्या दिवशीच शिष्यवृत्ती आणि ३८७ लाभार्थींचा उदरनिर्वाह भत्ता वितरित करण्यात आला. तसेच, गणेशोत्सवापूर्वीच दोन महिन्यांचा आगाऊ भत्ता देण्याचे निर्देश दिल्याने लाभार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वर्ष २०२६-२७ या वर्षाकरिता दिव्यांग लाभार्थींना घरी बसूनच मोबाइलवरील ‘सक्षम’ ॲपद्वारे दरमहा ११ ते ३० तारखेदरम्यान ऑनलाइन फेस स्कॅनिंगद्वारे हयातीबाबतची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कार्यालयात प्रत्यक्ष फेऱ्या मारण्याची आवश्यकता उरलेली नाही; ज्यामुळे पारदर्शकता वाढून वेळेची बचत होणार आहे आणि दरमहा विनाअडथळा लाभ मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थींनाही आता महापालिकेतर्फे दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्याचा लाभ देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com