Chh. Sambhajinagar : मॅडम, मला मदत करा, नाहीतर माझी मुलगी नशेसाठी गायब होईल! काही मुले तिला शाळेत जाऊ देत नसल्याचे मांडले वास्तव

Damini Squad : अवघ्या 14 वर्षांच्या मुलीच्या व्यसनाधीनतेबाबत आईने दामिनी पथकाकडे मदतीची याचना केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मुलीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले.
Chh. Sambhajinagar
Chh. Sambhajinagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मॅडम... मला मदत करा, नाहीतर माझी मुलगी उद्या होळीच्या दिवशी नशा करण्यासाठी गायब होईल! काहीही करा, पण माझ्या मुलीला यापासून वाचवा हो...’’ अत्यंत भेदरलेल्या सुरात एका मातेचा हा कॉल दामिनी पथकाला आला आणि त्याही हादरून गेल्या. अवघी चौदा वर्षांची लेक दारू-गांजाच्या आहारी गेल्याचे दुःख या मातेने सांगताच क्षणभर काय बोलावे, हे दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनाही सुचत नव्हते. त्यांनी तातडीने या मुलीच्या घरी जाऊन तिला समजावले आणि व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com