मुख्यालयी राहून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा द्या

मुख्यालयी राहून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा द्या
Published on: 
आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक -------------------- मुख्यालयी राहून दर्जेदार आरोग्यसेवा द्या ः सीईओ माथुर सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ६ : जि. प. सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत आरोग्य विभागाचे विविध राष्ट्रीय कार्यक्रम, योजना, प्रशासकीय कामकाज, आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड नोंदणी, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दिवाळी सुटीच्या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना नियमित व प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती व लोकसहभाग वाढविणे, गावनिहाय कृती आराखडा तयार करणे, ‘पालकमंत्री आरोग्यदूत अभियानांतर्गत’ आयुष्मान आरोग्य मंदिर पथकांमार्फत नागरिकांना त्यांच्या गावात व घराजवळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. जिल्ह्यात माता व बालमृत्यू रोखण्यासाठी मातेच्या गर्भधारणेच्या नोंदणीपासूनच मातांना नियमित तपासणी, समुपदेशन व आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात. बालकांच्या नियमित लसीकरणासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम करावे. गोवर-रुबेला सर्वेक्षण व अहवाल सादरीकरण प्रभावीपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आरोग्य संस्थांचे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करावी. टेलिकन्सल्टेशन, ई-सुश्रुत डॅशबोर्ड, एचएमआयएस व आयडीएसपी प्रणालीवरील माहिती नियमित अद्ययावत करून दैनंदिन अहवाल वेळेत सादर करावेत. जनआरोग्य समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना उपचारांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध राष्ट्रीय आरोग्य अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांच्या नियमित बैठका तसेच क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निक्षय मित्रांच्या माध्यमातून सर्व ८०० क्षयरुग्णांना पोषण किट उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. थुंकी नमुना संकलनाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिंदे, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. केंद्रिकर, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष गुंजकर, सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. -------------- ((चौकट)))) निष्काळजीपणा केल्यास कडक कारवाई सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जबाबदारीने आरोग्यसेवा द्यावी. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा करू नये. कामकाजात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दिले. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.