Chh. Sambhajinagar : जिल्हा रुग्णालयाकडून वीस औषधी ‘क्वारंटाइन’; ‘एनएबीएल’ मान्यताप्राप्त लॅबचा अहवाल आल्यानंतरच वापर
District Hospital Quarantines 20 Medicines : जिल्हा रुग्णालयाने २० औषधांना ‘क्वारंटाईन’ केले असून, एनएबीएल चाचणी अहवालानंतरच वापर होणार आहे. बनावट औषध प्रकरणामुळे हा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील बनावट औषधींचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयाने नुकतीच खरेदी केलेली सुमारे वीस औषधे ‘क्वारंटाईन’ केली आहेत.