पुढील आठवड्यात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

पुढील आठवड्यात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद
Published on
पुढील आठवड्यात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. १५ : जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासह स्थानिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून पुढील आठवड्यात होणाऱ्या या परिषदेत जिल्ह्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) अमोल इंगळे यांनी केले आहे. उद्योगमंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही परिषद होणार आहे. परिषदेदरम्यान विविध उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नवीन गुंतवणुकीला चालना मिळण्यासह रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. परिषदेत नांदेड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रे, गुंतवणुकीच्या उपलब्ध संधी, उद्योजकांचे अनुभव तसेच उद्योग क्षमता असलेल्या विविध क्षेत्रांतील गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधींवर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय प्रस्तावित गुंतवणुकीसंदर्भातील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देणे, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे, नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे हा परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी या संधीचा लाभ घेऊन परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राने केले आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभाग नोंदविताना अडचणी येत असल्यास अमोल इंगळे, सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com