esakal | Diwali Bhaubeej 2020 : आज पाडवा, भाऊबीज एकाच दिवशी साजरी होणार
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Image 2020-11-16 at 09.15.46.jpeg

दिवाळीत यंदा पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी साजरी होणार आहे. तसेच दरवर्षी होणारे दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Diwali Bhaubeej 2020 : आज पाडवा, भाऊबीज एकाच दिवशी साजरी होणार

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : दिवाळीत यंदा पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी साजरी होणार आहे. तसेच दरवर्षी होणारे दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र काही प्रमाणात ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.सोमवारी (ता.१६) कार्तिक शुध्द प्रतिपदा अर्थात बालप्रतिपदा या दिवशी बळीराजाला पाताळाचे राज्य वामन अवतारात भगवंतानी दिली. बळीराज्याच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो. यासह याच दिवशी गोवर्धन पूजाही करण्यात येणार आहेत.

Diwali Lakshmi Pujan 2020 : दिव्यांच्या रोषणाईत लक्ष्मीपूजन, झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा अन् सप्तरंगी रांगोळ्यांनी सजले अंगण

साडेतीन महुर्तापैकी एक असलेला पाडव्याला व्यापारी नवीन व्यवसायाची सुरुवात करतात. तसेच नवीन घर घेणे,भूमिपूजन करणे, नवीन वाहन, सोने-चांदी खरेदी केली जाते. यासह पाडव्याच्या दिवाशी पत्नी पतीचे औक्षण करते. यंदा भाऊबीज आणि पाडवा एकत्र आल्याने चंद्रोदय झाल्यावर बहिण भावाला ओवाळतो. व बहिणीचे संरक्षण करणे, महिलांचा सन्मान करण्याचा वचन घेणारा हा दिवस असतो. यानंतर सायंकाळी सर्वजन एकत्र येत दिपोत्सव साजरा करण्यात येणारा आहेत. अशी माहिती रामकृष्ण बारहाते यांनी दिली.

दिवाळी पहाट रद्द
दिवाळीनिमित्त दरवर्षी शहरात राजकीय पक्ष, सामाजिक क्षेत्रात काम करणारे संस्था आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात येतो. कोरोना आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे काहींनी कार्यक्रम रद्द केला आहे. तर काहीजण ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम घेणार आहे. अभ्युदय फाउंडेशनचा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आला. सोमवारी (ता.१६) दोन वर्षापूर्वी म्हणजेच २०१७ ला गायक राहुल देशपांडे, महेश काळे यांच्या दिवाळी पहाटचे फेर प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

‘डेक्कन पोल’ या यूट्यूब चॅनेलवर दिवाळीच्या दिवशी फेरप्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती अभ्युदय फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश राऊत यांनी दिली. आमदार सतीश चव्हाण यांनीही पदवीधर निवडणुकीमुळे यंदाचा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द केला आहे. आलाप फाऊंडेशनचाही दिवाळी पहाटचा कार्यक्रम रद्द झाल्याचे अभिजित शिंदे यांनी सांगितले. आमदार अतुल सावे यांच्यातर्फेही हा कार्यक्रम घेण्यात येणार नाही. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांच्यातर्फे गेल्या वर्षा दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला होता. यंदा कोरोनामुळे कार्यक्राम घेण्यात येणार नसल्याचे अमोल चव्हाण आणि श्री.शेळके यांनी सांगितले.
 

Edited - Ganesh Pitekar

loading image