एसटी चालक–वाहकांचे अभ्यंगस्नान; फराळाचाही घेतला आस्वाद

एसटी चालक–वाहकांचे अभ्यंगस्नान; फराळाचाही घेतला आस्वाद
Published on: 
फोटो १ ABD26J82937 छत्रपती संभाजीनगर ः बाहेरगावाहून आलेल्या मुक्कामी बसच्या चालक आणि वाहकांनी अभ्यंगस्नानानंतर रविवारी (ता. आठ) फराळ करून दिवस सुरू केला. फोटो २ ABD26J82938 छत्रपती संभाजीनगर ः मुक्कामी बसच्या चालक आणि वाहकांच्या अभ्यंग स्नानाची सोय करण्यात आली. तेथे या कर्मचाऱ्यांना सुगंधी उटणेही देण्यात आले. ..... एसटी चालक–वाहकांचे अभ्यंगस्नान; फराळाचाही घेतला आस्वाद छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : रात्री उशिरा आलेल्या मुक्कामी एसटी महामंडळाच्या बसेसच्या चालक-वाहकांना दिवाळीचा आनंद मिळावा म्हणून मध्यवर्ती बसस्थानकात या बाहेरगावच्या चालक-वाहकांची अभ्यंगस्नानाची व्यवस्था करण्यात आली होती. यासह फराळ देऊन या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देण्यात आला. रविवारी (ता. आठ) पहाटे ४ पासून चालक-वाहक विश्रांतीगृहाच्या परिसरात सनईचे मंगलमय सूर, उटण्याचा दरवळ आणि पारंपरिक दिवाळीचे वातावरण यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. मुक्कामी थांबलेल्या बाहेरगावच्या चालक-वाहकांना ड्यूटीमुळे घरी राहता येत नाही, अभ्यंगस्नान आणि फराळाचा आनंद घेता येत नाही. पण, येथे चालक-वाहक बांधवांना पारंपरिक पद्धतीने अभ्यंगस्नान घालून दिवाळीच्या सणाचा आनंद देण्यात आला. त्यानंतर सर्वांना चहा व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक संजय चव्हाण, आगार व्यवस्थापक रणजित राजपूत, स्थानक प्रमुख संतोष नजन, सहायक वाहतूक निरीक्षक बाबासाहेब साळुंखे, घनश्याम मस्के, उद्धव भोळे, भगवान शेवाळे, युसूफ, प्रकाश झिंजुर्डे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.