जिल्हा कारागृहात ‘दिवाळी पहाट’ उत्साहात साजरी

जिल्हा कारागृहात ‘दिवाळी पहाट’ उत्साहात साजरी
Published on: 
जिल्हा कारागृहात रंगली दिवाळी पहाट ------- न्यायबंदींसाठी भजन, भावगीते अन् देशभक्तिपर गीतांची मेजवानी सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ८ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी व जिल्हा कारागृह वर्ग-२, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील न्यायबंदींसाठी दिवाळी पहाट हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी (ता. आठ) सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमातून न्यायबंदींच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासह त्यांच्या मनात सकारात्मक विचार आणि नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भूपण काळे यांनी उपस्थित न्यायबंदी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कारागृहातही सण-उत्सवाच्या माध्यमातून आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात संगीतकार डॉ. सुधीर वनशेठीकर, डॉ. सी. बिन्या वनशेठीकर, श्रीराम वाघमारे, रंजिता वाघमारे यांनी अभंग, भक्तिगीते, भावगीते, देशभक्तिपर गीते, दिवाळी विशेष गीतांचे सादरीकरण केले. या संगीतमय कार्यक्रमामुळे कारागृहातील वातावरण आनंदमय झाले. न्यायबंदींचाही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा कारागृह वर्ग-२ चे अधीक्षक पांडुरंग भुसारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तुरुंगाधिकारी गजेंद्र मरळे, उपतुरुंगाधिकारी स्वाती जाधवर यांच्यासह विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी आणि कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.