शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का?

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का?
Published on: 
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का? ---- शासनाच्या भरीव अनुदानासह पीकविम्याची प्रतीक्षा विवेक पोतदार जळकोट, ता. २९ : यंदा पावसाअभावी जळकोट तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे अडचणीत आला आहे. सोयाबीनसह कापूस, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पीक कापणी प्रयोगांतून सोयाबीनचा उतारा अत्यल्प मिळत असल्याचे चित्र आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून,पिकविमा मंजुरी व शासन मदत लवकर मिळून यंदाची दिवाळी गोड होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असली तरी ती रक्कम वाढवण्याची मागणी केली जात आहे. जळकोट हा डोंगरी भागातील तालुका असून, बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. हलक्या जमिनी, पावसाचे अनियमित प्रमाण आणि पावसातील दीर्घ खंड यामुळे पिकांची वाढ खुंटली. खरीप हंगामाच्या सुरवातीला पेरणी झाल्यानंतर पावसाने साथ न दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. कापूस आणि तूर ही पिकेही होरपळली आहेत. सोयाबीन हे जळकोट तालुक्यातील प्रमुख खरीप पीक आहे. मात्र, पावसाअभावी शेंगांची संख्या आणि दाण्यांची भर यावर परिणाम झाला आहे. सध्या सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगांतून सोयाबीनचा उतारा अत्यल्प मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे. केलेला खर्च वसूल होण्याची शक्यता कमी आहे. रब्बी हंगामही पेरणीविना जाण्याची शक्यता आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हक्काचा पीकविमा मंजुरी आणि नुकसानभरपाईची रक्कम खात्यावर जमा होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. सणासुदीच्या काळात घरखर्च, मुलांचे शिक्षण, शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि अन्य आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com