ऑनलाइन शॉपिंगकडे कल; दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला पसंती

online shopping
online shoppingsakal media

औरंगाबाद : दिवाळीनिमित्त (Diwali Festival) ई-कॉमर्स कंपन्या (E-commerce company) मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. त्यामुळे ई-शॉपिंगला (E-shopping) ग्राहकांची अधिक पसंती (consumer choice) मिळत आहे. ५० ते ६० टक्‍क्‍यांपर्यंत इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर (electronic objects) विशेष सूट (discount) मिळत आहे; तसेच अवघ्या तीन ते चार दिवसांत वस्तू घरपोच मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत (online shopping) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

online shopping
रात्री आठ ते दहा वेळेतच फटाके उडवण्यास परवानगी; अन्यथा कायदेशीर कारवाई

अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, मोबाईल, पादत्राणे यांसारख्या हजारो वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. खरेदी केलेल्या वस्तू तीन ते चार दिवसांत घरपोच मिळत आहेत. तसेच या वस्तूंमध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा शंका असल्यास दहा दिवसांत ती वस्तू पुन्हा परत करता येत असल्याने ग्राहकांमध्ये ऑनलाइन खरेदी सुरक्षित बनली आहे.

मोठ्या प्रमाणात ऑफर्स आणि सूट मिळत असल्याने खरेदीसाठी उत्तम पर्याय म्हणून ऑनलाईन शॉपिंग कपन्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. दिवाळीतील भेटवस्तू, इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌स, कपड्यांच्या ऍक्‍सेसरीज, तयार कपडे, गृहोपयोगी वस्तू, संगणक, टीव्ही, लॅपटॉप, खेळणी, दागिने, सौंदर्यप्रसाधने, आरोग्य उत्पादने आदींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

यात सर्वाधिक विक्री ही मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍक्‍सेसरीज, टीव्ही यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूंची होत आहे. यावर सुमारे ८० टक्‍क्‍यांपर्यंत सवलती दिल्या जात आहेत. दिवसातील अधिक वेळ तरुणाई इंटरनेटवर व्यस्त असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवाळीनिमित्त ऑनलाइन शॉपिंगवर विशेष सवलती मिळत आहे. त्यामुळे घरबसल्या खरेदी करण्यात तरुणाईचा कल अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com